IPL 2021: Adam Jampa and Ken Richardson also quit for fear of Corona
क्रीडा

IPL 2021 : RCB ला मोठा धक्का, अ‍ॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन यांची स्पर्धेतून माघार

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू टायने IPL 2021 मधून माघार घेतल्यानंतर आता अ‍ॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन यांनीही स्पर्धेतून माघार घेतली आहे. भारतातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीने या तिन्ही खेळाडूंनी या स्पर्धेतून आपली नावे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅडम झॅम्पा आणि केन रिचर्डसन हे दोघेही IPL मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) चे खेळाडू आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे आता हळूहळू खेळाडू या स्पर्धेतून नावे मागे घेत आहेत. सनरायझर्स हैदराबादशी सामना झाल्यानंतर दिल्ली कॅपिटलचा स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले. आता रिचर्डसन आणि झॅम्पा हे आरसीबीचे खेळाडूही मायदेशी परतण्यास तयार आहेत. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी हा मोठा धक्का आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत