Ind vs Aus 1st T20I: Team India's victory over Australia
क्रीडा

Ind vs Aus 1st T20I : ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा दणदणीत विजय

Ind vs Aus 1st T20I : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सीरिजमधील पहिली मॅच जिंकत टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाचं 162 रन्सचं आव्हान घेऊन उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावत 150 रन्सपर्यंत मजल मारता आली आणि टीम इंडियाने ही मॅच 11 रन्सने जिंकली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मॅचच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावत 161 रन्स केले. टीम इंडियाकडून केएल राहुल याने सर्वाधिक म्हणजेच 51 रन्सची खेळी खेळली. शिखर धवन एका रनवर माघारी परतला त्यानंतर विराट कोहली 9 रन्सवर आऊट झाला. संजू सॅमसनने 23 रन्स, मनीष पांडेने दोन रन्स केले. यानंतर रवींद्र जाडेजाने 23 बॉल्समध्ये नॉट आऊट राहत 44 रन्स केले.

ऑस्ट्रेलियाकडून हेनरिक्स याने सर्वाधिक म्हणजेच तीन विकेट्स घेतल्या. त्याने चार ओव्हर्समध्ये 22 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. स्टार्क याने दोन विकेट्स घेतल्या. तर हेझलवूड आणि स्वीप्सन या दोघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

ऑस्ट्रेलियाकडून मैदानात आलेले ओपनर्स शॉर्ट आणि फिंच चांगली पार्टनरशिप करत असताना अॅरॉन फिंचला चहलने आऊट केले. अॅरोन फिंच याने 26 बॉल्समध्ये 35 रन्स केले. त्यानंतर शॉर्ट सुद्धा माघारी परतला. त्याने 34 रन्स केले. स्मिथ 12 रन्स, मॅक्सवेल दोन रन्सवर आऊट झाला. मॅथ्यू वेड सात रन्स करुन माघारी परतला. त्यानंतर हेनरिक्स याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. हेनरिक्सने 20 बॉल्समध्ये 30 रन्स केले. नटराजन याने स्टार्कला आऊट केलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत