Bollywood actor Faraz Khan
मनोरंजन

बॉलिवूड अभिनेता फराज खानचे निधन

बॉलिवूड अभिनेता फराज खानने वयाच्या ४६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. फराज खान बंगळूरु येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. त्याला तिसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. पण त्याच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे अभिनेत्री पूजा भट्टने त्याला आर्थिक मदत करा अशी विनंती केली होती. त्यानंतर सलमान खानने त्याला २५ लाख रुपयांची मदत केली असल्याचे म्हटले जाते. आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पूजा भट्टने फराज खानच्या निधनाची ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केलं कि, मला तुम्हाला सांगताना दु:ख होत आहे की अभिनेता फराज खानचे निधन झाले आहे. तुम्ही सर्वांनी त्याला आर्थिक मदत केली आणि तो लवकर बरा व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना केली त्याबद्दल तुमचे आभार’ असे ट्विट पूजा भट्टने केले आहे.

फराज खान बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता होता. १९९६ साली ‘फरेब’ या चित्रपटातून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यांनंतर त्याने ‘पृथ्वी’, ‘दुल्हन बनू में तेरी’, ‘चाँद बुझ गया’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले. ‘मेहंदी’ या चित्रपटात त्याने अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत काम केले. शिवाय ‘वन प्लस वन’, ‘शूsssss कोई है’, ‘रात होने को है’, ‘करिना करिना’ यांसारख्या काही मालिकांमध्ये देखील त्याने काम केले होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत