Indorikar maharaj deshmukh
महाराष्ट्र

इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, कोर्टात अंनिसचा वकीलही युक्तिवाद करणार

अहमदनगर : लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्याविरोधात संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच प्रकरणी संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला होणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ऐच्छिक संतती प्राप्तीसाठी वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरुन निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्याविरोधात दाखल खटल्यात आपल्यालाही बाजू मांडू द्यावी यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. यावर आज संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी बचाव पक्षाच्या वकीलांनी अंनिसच्या याचिकेला कडाडून विरोध केला, मात्र सरतेशेवटी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश डी.एस. घुमरे यांनी सदरची हस्तक्षेप याचिका मंजूर करतांना अ‍ॅड. रंजना गवांदे यांना अंनिसच्यावतीने लेखी स्वरुपात बाजू मांडण्याची परवानगी दिली. त्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणी वाढणार आहेत. आता यापुढील सुनावणीत इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात सरकारी वकिलासोबतच अंनिसचे वकिलही युक्तिवाद करणार आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत