Maharashtra Board Extends SSC Exam Form Submission Deadline to November 17, 2025
महाराष्ट्र मुंबई शैक्षणिक

दहावीच्या परीक्षेचे अर्ज विलंब शुल्कासह भरण्यास १७ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परिक्षेस बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरावयाचे आहेत. विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

त्याचप्रमाणे पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत प्रचलित पद्धतीने भरावयाची आहेत. हे अर्ज www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने भरावयाच्या विलंब शुल्काच्या तारखांना अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. या तारखांना पुन:श्च मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत