मुंबई : भारतीय ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किमती पुन्हा एकदा वाढवल्या आहेत. विना सबसिडीवाल्या गॅस सिलिंडरची किंमत आता 769 करण्यात आली आहे. 14 फेब्रुवारीला रात्रीपासून घरगुती गॅस सिलिंडर नव्या दरात उपलब्ध होणार आहे. आता घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 769 रुपये असणार आहे. IOCL प्रत्येक महिन्याला LPG गॅस सिलिंडरच्या किमतीची समिक्षा करते आणि नव्या दरांची […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेने स्पष्ट केली त्यांची भूमिका
पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. जे पुढं येईल त्याप्रमाणे कारवाई होईल. पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. निःपक्षपातीपणे याचा तपास होईल, असं नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच या गोष्टीचं राजकारण करू नये, […]
माढ्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला त्यांनी… चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांवर पलटवार
सांगली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना लगावला. ते सांगली येथे बोलत होते. “मला गाव सोडून […]
नितीन गडकरी यांनी केला धक्कादायक खुलासा, देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस
नागपूर : देशातील 30 टक्के वाहन परवाने बोगस असल्याचा धक्कादायक खुलासा केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी आपले अधिकारी आणि इंजिनियर्स यांना बोगस लायसन्स तसेच रस्त्यावरचे मृत्यू यासाठी जवाबदार धरले आहे. ते रस्ता सुरक्षा अभियानाच्या एका कार्यक्रमात नागपूरमध्ये बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी आपल्याच विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलं आहे. वाहन […]
सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांची आत्महत्या, पोलीस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडली
नवी मुंबई : APMC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. सरकारी रिव्हॉल्व्हरने पोलीस ठाण्यातच पवार यांनी स्वत:वर गोळी झाडली. भूषण पवार यांना तातडीने MGM रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत APMC पोलीस ठाण्यात भूषण पवार यांनी स्वत:वर गोळी […]
‘व्हॅलेंटाईन डे’ चं अनोखं गिफ्ट, नवरा आपल्या आजारी बायकोला भेट देणार किडनी
गुजरातमध्ये एक व्यक्ती व्हॅलेंटाईन डे निमित्त आपल्या आजारी पत्नीला आपली किडनी दान करून एक अनोखी भेट देत आहे. विनोद पटेल 14 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये पत्नी रीता पटेल यांना किडनी दान करतील. खास गोष्ट अशी की, हे जोडपे आपला लग्नाचा 23 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. रीता पटेल या ऑटोइम्यून मूत्रपिंड डिसफंक्शनने ग्रस्त आहेत आणि गेल्या […]
गोपीचंद पडळकर यांचा सध्या महाराष्ट्रामध्ये टीआरपी जास्त, सदाभाऊ खोत यांनी केलं कौतुक
सांगली : आमदार गोपीचंद पडळकर यांचा सध्या महाराष्ट्रामध्ये टीआरपी जास्त आहे, असं म्हणत माजी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पडळकरांचं कौतुक केलं आहे. गोपीचंद पडळकर टीव्हीवर आले की आज हा माणूस कुणाला काय बोलणार हे बघण्यासाठी लोकं टीव्हीसमोर थांबतात. त्यामुळे पडळकर आता मंत्री पदासाठी तुमचाच नंबर आहे. तुम्ही शंभर टक्के मंत्री होणार. हिंदकेसरी पै. […]
मुंबई व उपनगरातील महाविद्यालयं सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय नाही
मुंबई : राज्यातील महाविद्यालये उद्या (15 फेब्रुवारी) सुरु होणार आहेत. मात्र मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालय उद्या सुरू होणार नाहीत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांनी दिली आहे. स्थानिक प्रशासन कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यापीठ महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय देईल, असं शासन निर्णयात सांगितलं आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाला मुंबई महापालिका आयुक्तांनी पत्र पाठवून 22 फेब्रुवारीपर्यत कोरोना परिस्थितीचा […]
ब्रेकिंग : ओमर आणि फारुख अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा उमर अब्दुल्ला यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना काल पुलवामा येथे जाण्यास परवानगी दिली नव्हती. ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करत म्हटलं कि, “तुमचे लोकशाहीचे नवीन मॉडेल […]










