IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना चेन्नई येथे खेळला जात आहे. आज रविचंद्रन अश्विनने दमदार शतक पूर्ण केले. तिसर्या दिवशी टीम इंडियाने दुसर्या डावात 9 विकेट गमावून 260+ धावा केल्या. संघाने आतापर्यंत इंग्लंडवर 460+ धावांची आघाडी घेतली आहे. सध्या रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज क्रीजवर आहेत. अश्विनने 5 वे […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचं मोठं विधान
नागपूर : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वन मंत्री संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणी राठोड यांचीही चौकशी होणार, हे स्पष्ट झालं आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांवर कोणताही दबाव नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत. चौकशी अहवाल आल्यावर सत्य निष्पन्न होईल, असं […]
मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाची फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिस, केली ‘ही’ महत्वाची टिपण्णी
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी करत म्हटलं कि, आपली कंपनी २-३ लाख कोटी डॉलर्सची असेल, परंतु लोकांची प्रायव्हसी यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सुनावणीवेळी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला नोटिसा बजावल्या आहेत. व्हॉट्सअॅपला नोटीस बजावत यावर्षी जानेवारीत भारतात लागू करण्यात आलेल्या नवीन […]
ब्रेकिंग : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना कोरोनाची लागण, काल स्टेजवर आली होती चक्कर
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल विजय रुपाणी एका कार्यक्रमाच्या स्टेजवर चक्कर येऊन बेशुद्ध पडले होते. यानंतर त्यांना यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाने जारी केलेल्या वैद्यकीय बुलेटिननुसार सीएम रुपाणी यांची प्रकृती स्थिर आहे. डॉ. आर. के. पटेल यांनी सोमवारी सांगितले की, “विजयभाई यांचे ईसीजी, इको, सीटी स्कॅन, ऑक्सिजन […]
सेन्सेक्सने आज गाठली विक्रमी पातळी, गुंतवणूकदारांची मालमत्ता एक लाख कोटींनी वाढली
मुंबई : सेन्सेक्सने आज विक्रमी पातळी गाठली आहे. आज सोमवारी सकाळी बाजार सुरु होताच सेन्सेक्स ५०० अंकांनी वधारला आणि पहिल्यांदाच ५२००० अंकांच्या पातळीवर गेला आहे. या तेजीत गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान एक लाख कोटींनी वाढली आहे. आजच्या सत्रात बँका, वित्त संस्था, एफएमसीजी, ऑटो या शेअरला चांगली मागणी आहे. सेन्सेक्सने सकाळी ९.३० वाजता ५२०४०.०० अंकांची विक्रमी पातळी […]
संतापजनक : पुण्यात पाच वर्षाच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाने केला बलात्कार, रुग्णालयात उपचार सुरू
पुणे : विमाननगर भागात अतिशय संतापजनक घटना घडली आहे. एका हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने पाच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी दिलीपकुमार गोस्वामी नावाच्या २0 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पीडित चिमुकलीवर सध्या उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिचे आई वडील एका लेबर कॅम्पमध्ये राहतात. आई वडील कामावर गेल्यानंतर आरोपीने या मुलीला घराबाहेर […]
आजपासून FASTag अनिवार्य, जाणून घ्या कुठे मिळेल FASTag ..
मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल नाक्यांवर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे. ज्यांच्याकडे FASTag नाही त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल. यापूर्वी 1 जानेवारीपासून टोल नाक्यांवर कॅशलेन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर दीड महिना मुदतवाढ देण्यात आली. मात्र आता […]
जळगावात ट्रक उलटून भीषण अपघात; 15 मजूर जागीच ठार
जळगाव : जळगावच्या यावल तालुक्यात किनगाव नजीक जवळ रविवारी रात्री भीषण अपघात झाला यात 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहिती नुसार, साधारण रात्री एक वाजताच्या सुमारास येथील यावल चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. पपई घेऊन हा ट्रक […]
पूजाबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे तिच्या वडिलांचा उद्वेग.. बदनामी थांबवा, नाहीतर…
बीड: टिक टॉक स्टार पूजा चव्हाणच्या वडीलाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. लहू चव्हाण म्हटले कि लेक गमावल्याने माझ्यावर खूप मोठा आघात झाला असून पूजाबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चांनी मी अस्वस्थ झालो आहे. आमचे अर्धे कपडे काढलेच आहात. आता उरलेले कपडे तरी काढू नका. त्यातून आमची बदनामीच होईल आणि हि थांबवली नाही तर मी आत्महत्या […]
पालघर-मनोर रस्त्यावर भीषण अपघात, पिकअप पलटी झाल्यामुळे 10 ते १२ मजूर गंभीर जखमी
पालघरहून चाहडे नाक्याकडे जाणाऱ्या पिकअपला भीषण अपघात झाला आहे. पालघर-मनोर रस्त्यावर जीप आणि पीकअपच्या झालेल्या या अपघातात पिकअपमधील 12 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पिकअप पलटी झाल्यामुळे मजूर गंभीर जखमी झाले. विनोद कुकवेयर कंपनी जवळ जीपचा भीषण अपघात झाला. जीपमधील 10 ते 12 मजूर गंभीर […]










