Fastag mandatory for all four-wheelers
महाराष्ट्र

आजपासून FASTag अनिवार्य, जाणून घ्या कुठे मिळेल FASTag ..

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रविवारी रात्री 12 वाजेपासून सर्व टोल नाक्यांवर कॅशलेन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. आता वाहनांना फक्त FASTag मधून टोल भरावा लागणार आहे. ज्यांच्याकडे FASTag नाही त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल. यापूर्वी 1 जानेवारीपासून टोल नाक्यांवर कॅशलेन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नंतर दीड महिना मुदतवाढ देण्यात आली. मात्र आता FASTag च्या अंमलबजावणी मुदतीला पुढे ढकललं जाणार नाही, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. वाद टाळण्यासाठी टोल प्लाझावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कुठे मिळेल FASTag ?

पेटीएम, अॅमेझॉन, स्नॅपडील इत्यादींकडून FASTag खरेदी केलं जाऊ शकतं. तसेच, देशातील 23 बँकांच्या माध्यमातून FASTag उपलब्ध होईल. या व्यतिरिक्त रस्ते वाहतूक प्राधिकरण कार्यालयातही FASTag ची विक्री केली जाते. इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (आयएचएमसीएल) च्या माध्यमातूनही FASTag ची विक्री होते. फास्टॅग बँकेत उपलब्ध असून तो २०० रुपयांना मिळतो. हा टॅग कमीत कमी १०० रुपयांपासून रिचार्ज करून मिळेल. ‘फास्टॅग’ खात्यातील टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहनचालकाला त्यासंबंधीचा एक ‘एसएमएस’ त्यांच्या मोबाइलवर येईल. खात्यातील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. ‘फास्टॅग’ची मुदत पाच वर्षांची असेल. त्यानंतर ते नव्याने खरेदी करावे लागणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत