मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आता संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. यावर संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया देत म्हटलं कि, संजय राठोड यांनी राजीनामा दिला की नाही हे मला माहिती नाही. संजय राऊत म्हणाले कि, “हा […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
IPL 2021 : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नाव बदलले, संघाचे आता ‘हे’ नाव
इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा सीजन एप्रिल-मेमध्ये सुरु होणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. 14 व्या सीजनपूर्वी पंजाब संघाने मोठा बदल केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने आपले नाव बदलले असून इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील सीजनमध्ये हा संघ ‘पंजाब किंग्ज’ म्हणून ओळखला जाईल. दरम्यान, इंडियन प्रीमियर लीगच्या 14 […]
५४ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कालव्यात कोसळली, 4 प्रवाशांचा मृत्यू, बचावकार्य सुरु
मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात आज सकाळी (१६ फेब्रुवारी) भीषण अपघात झाला. ही बस सतनाकडे जात असताना कालव्यात कोसळली. बसमध्ये ५४ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बस कालव्यात कोसळल्याने 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत 7 लोकांना वाचवण्यात यश मिळालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस कालव्यात […]
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनजीक फुडमॉलजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. कंटेनर ट्रेलर, इनोव्हा कार, क्रेटा कार, टेम्पो, ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. एका कंटेनरने मागच्या बाजूने […]
मोठी बातमी : संजय राठोड यांचा अखेर राजीनामा… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा स्वीकारणार की नाकारणार याकडे लक्ष
मुंबई : वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा मातोश्रीवर पाठवला आहे. ते पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याचे सांगितले […]
एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याने केली आत्महत्या.. आत्महत्यापूर्वी शेअर केला व्हिडिओ… जाणून घ्या
मुंबई : एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी चित्रपटात काम करणारा अभिनेता छोटू भैय्या म्हणजे संदीप नहार याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्याने आत्महत्या करण्यामागचं कारण सांगितलं आहे. तो वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अस्वस्थ होता असं सांगितलं. पोलिसांना यासंबंधी माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले आहेत. गुन्हा दाखल करत तपास […]
महत्वाची बातमी : कोरोनापासून वाचवण्यात व्हिटॅमिन-सी आणि झिंक अपयशी, अभ्यासात मिळाले धक्कादायक निष्कर्ष
व्हिटॅमिन- सी आणि झिंक कोरोना बरोबर लढायला मदत करतात, हे दावे चुकीचे असल्याचं समोर आलं आहे. व्हिटॅमिन सी आणि झिंकचा प्रभाव शोधण्यासाठी क्लिनिकल चाचणी केली गेली, ज्यामध्ये समोर आलं की व्हिटॅमिन- सी आणि झिंक यांचा कोरोनावर काहीही परिणाम होत नाही. त्यांचे हाय-डोस देखील यावर परिणाम दर्शविण्यास अपयशी ठरले आहेत. व्हिटॅमिन सी आणि झिंकवरील हे नवीन […]
जळगाव अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल, मदतीची घोषणा
जळगाव : किनगावजवळ टेम्पो पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यात आभोडा येथील 12, केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ टेम्पो पलटून हा अपघात झाला. या अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. अपघातग्रस्तांना […]
ब्रेकिंग : सुशांतची बहीण प्रियंकाच्या अडचणीत वाढ, रियाने केलेली FIR रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहीण प्रियंकाविरूद्ध दाखल केलेली FIR रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (15 फेब्रुवारी) नकार दिला. परंतु, त्याची दुसरी बहीण मितूविरुद्ध दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याचा आदेश देण्यात आला त्यामुळे तिला दिलासा मिळाला आहे. ही FIR सुशांतसिंग राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीने दाखल केली होती. पटना येथे सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये रिया […]
ब्रेकिंग : आरे कॉलनी जंगलात भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
मुंबईतील आरे कॉलनीच्या वनक्षेत्रात भीषण आग लागल्यामुळे दहशत पसरली आहे. आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, जंगलाच्या आगीमुळे झाडांचे फार नुकसान झाले आहे. आरे कॉलनीत असलेल्या वनक्षेत्रात आग लागली. रॉयल पाम […]










