sandeep nahar

एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्याने केली आत्महत्या.. आत्महत्यापूर्वी शेअर केला व्हिडिओ… जाणून घ्या

मनोरंजन

मुंबई : एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी चित्रपटात काम करणारा अभिनेता छोटू भैय्या म्हणजे संदीप नहार याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्याने आत्महत्या करण्यामागचं कारण सांगितलं आहे. तो वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अस्वस्थ होता असं सांगितलं. पोलिसांना यासंबंधी माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले आहेत. गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

संदीप नहार व्हिडिओमध्ये म्हटले की, मी तुम्हाला बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसलो असेन. मी एमएस धोनी सिनेमात छोटू भैय्याची भूमिका साकारली होती. आज हा व्हिडिओ बनवण्याचं एक उद्दीष्ट आहे. हेतू हा आहे की माझ्या आयुष्यात बर्‍याच समस्या चालू आहेत हा हेतू आहे. मी मानसिकदृष्ट्या स्थिर नाही. याला कारण माझी पत्नी कंचन शर्मा आहे. मी दीड- दोन वर्षांपासून एका मानसिक ताणात जगत आहे. मी बायकोला वारंवार समजावून सांगितलं. आमचं ३६५ दिवस भांडण होतं.’

ती म्हणते की ती आत्महत्या करेल आणि त्यात मला अडकवेल. मी पूरता वैतागून गेलो आहे. माझ्या कुटुंबाला शिवीगाळ करते. माझ्या आईला शिव्या देते. तिच्यासमोर मी घरच्यांचे फोनही उचलू शकत नाही. माझं नाव कोणाशीही जोडते. ती नेहमीच माझ्यावर संशय घेते. संशयाला कोणतंही औषध नाही. काही दिवसांपूर्वी ती घरातून पळून गेली होती. मी तिला शोधलं. तिची आईच तिला साथ देते. एवढंच नाही तर केस करण्याचीही धमकी देते.

मित्रांनो, मी काही केलं तर तिने (कंचन) माझ्या घरातील सदस्यांना त्रास देऊ नये. ती माझ्या कुटुंबाचा खूप द्वेष करते. त्यांच्याविरोधात तिने केस करू नये. माझी बुलेट मला बाबांना द्यायची आहे. सोनसाखळी आईला द्यायची आहे. पैसे कंचनने घ्यावेत. ती स्वतःच्या चुका कधी मान्य करत नाहीत. तिला तिच्या चुका लक्षात याव्यात अशी अपेक्षा आहे. जर भविष्यात तिने लग्न केलं तर त्या माणसाने सर्वात आधी तिच्या मेंदूवर काहीतरी उपचार करून घ्यावेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत