Vitamin-C and zinc fail to save from corona

महत्वाची बातमी : कोरोनापासून वाचवण्यात व्हिटॅमिन-सी आणि झिंक अपयशी, अभ्यासात मिळाले धक्कादायक निष्कर्ष

कोरोना तब्येत पाणी लाइफ स्टाइल

व्हिटॅमिन- सी आणि झिंक कोरोना बरोबर लढायला मदत करतात, हे दावे चुकीचे असल्याचं समोर आलं आहे. व्हिटॅमिन सी आणि झिंकचा प्रभाव शोधण्यासाठी क्लिनिकल ​​चाचणी केली गेली, ज्यामध्ये समोर आलं की व्हिटॅमिन- सी आणि झिंक यांचा कोरोनावर काहीही परिणाम होत नाही. त्यांचे हाय-डोस देखील यावर परिणाम दर्शविण्यास अपयशी ठरले आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

व्हिटॅमिन सी आणि झिंकवरील हे नवीन संशोधन ‘जामा नेटवर्क ओपन’ मध्ये प्रकाशित केले गेले आहे. या अभ्यासानुसार दावा केला गेला आहे की घरी हे सप्लिमेंट्सचा वापर करणाऱ्या लोकांना कोविड 19 च्या बाबतीत याचा कोणताही फायदा होत नाही. या अभ्यासाचे निष्कर्ष इतके कमकुवत होते की ते त्वरित बंद करण्यात आला. जॉन हॉपकिन्सचे डॉ. एरिन मिचोस आणि ह्युस्टन मेथोडिस्टचे डॉ. मिगिल कॅन्झोस यांनी सांगितले कि, हे दोन्ही सप्लिमेंट्स त्यांचा प्रभाव दर्शविण्यात अपयशी ठरले आहेत.

या क्लिनिकल चाचणीत, असे 214 लोक सामील होते, जे कोरोनातून घरीच बरे होत होते. त्यातपण चार वेगवेगळे गट होते. पहिल्या गटाला व्हिटॅमिन सीची उच्च मात्रा दिली गेली, तर दुसर्‍या गटाला झिंकची उच्च मात्रा दिली. तिसर्‍या गटाला दोन्ही सप्लिमेंट्सचे कॉम्बिनेशन दिले गेले. या व्यतिरिक्त, चौथ्या गटाला सप्लिमेंट्स न देता फक्त विश्रांती, हायड्रेशन, ताप उतरवणारी औषधे दिली गेली.

क्लीव्हलँड क्लिनिकचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. मिलिंद देसाई आणि त्यांच्या टीमला आढळले की झिंक ग्लुकोनेट आणि व्हिटॅमिन सी च्या हायडोसचा SARS-CoV-2 लक्षणांवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट, जास्त डोसमुळे काही रुग्णांवर  दुष्परिणाम झाले. डॉ. एरिन मिकोस आणि डॉ. मिगिल कॅन्झोस त्यांच्या संयुक्त अहवालात म्हणाले कि, नेहमीच्या काळजी घेणाऱ्या गटाच्या तुलनेत सप्लिमेंट्स घेणाऱ्या गटात मळमळ, अतिसार आणि ओटीपोटात वेदना यासारखे गंभीर दुष्परिणाम दिसले.

व्हिटॅमिन सी एक सुप्रसिद्ध अँटिऑक्सिडंट आहे, जे रोगप्रतिकारक शक्तीला आधार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन सी सर्दी झाल्यावर मुलांना 14 टक्के दिलासा देते तर तरूणांना 8 टक्के दिलासा देते. तसेच झिंक शरीरातील पेशींना इन्फेक्शनशी लढण्यास सामर्थ्य देते. एका अहवालानुसार, शरीरात झिंकच्या कमतरतेमुळे प्रो-इंफ्लॅमेटरी सायटोकिन्स वाढण्याचा धोका असतो आणि अँटीबॉडीजची क्रियाशीलता कमी होते. परंतु, व्हिटॅमिन- सी आणि झिंक कोरोना बरोबर लढण्यात मात्र अपयशी ठरतात.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत