जळगाव : किनगावजवळ टेम्पो पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यात आभोडा येथील 12, केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर 5 गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ टेम्पो पलटून हा अपघात झाला. या अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आहे. अपघातग्रस्तांना पंतप्रधान कार्यालयाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.
अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर गंभीर जखमींना 50 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून ट्वीट करण्यात आले आहे. शोकाकुल कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
PM @narendramodi has approved an ex-gratia of Rs. 2 lakh each from Prime Minister’s National Relief Fund for the next of kin of those who have lost their lives due to the tragic truck accident in Jalgaon, Maharashtra. Rs. 50,000 would be given to those seriously injured.
— PMO India (@PMOIndia) February 15, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील किनगाव टेम्पो अपघातातील मृत मजुरांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत तर जखमींच्या उपचाराचाही खर्च करणार असल्याची घोषणा केली आहे. अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.




