whole day news top 5 news 25 september 2020 latest update
देश

दिवसभरातील ५ महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा, २5 सप्टेंबर २०२०

थोडक्यात घडामोडी : आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात…

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

  1. दीपिका पदुकोणचे नाव आलेच्या ड्रग्स चॅट प्रकरणी मोठा खुलासा – ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ड्रग्सबाबत चर्चा व्हायची त्या ग्रुपची अॅडमिन ही दीपिका पदुकोण असल्याचं समोर येत आहे
  2. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी जादा दर आकारल्यास कारवाई – अजित पवार – कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी कुठल्याही रूग्णालयाने जादा दर आकारू नये. असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच औषधांचा काळाबाजार करणार्‍यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी पुणे येथे झालेल्या बैठकीत दिला.
  3. पंकजा मुंडे- धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी – वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत मिळवून दिल्याचा दावा, यावरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पुन्हा समोरा-समोर आले आहेत, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुंडे बहीण-भावा मधील वाद काही काळ थांबला होता. मात्र, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या थकहमी वरून पुन्हा एकदा हा संघर्ष पाहायला मिळत आहे.
  4. जम्बो कोविड सेंटरमधून महिला बेपत्ता; जम्बो कोविड सेंटरचा कारभार फारच संतापजनक – ससून रूग्णालयातून अॅम्ब्युलन्समधून जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं, याठिकाणी उपचार सुरू असल्याचे कोविड सेंटरतर्फे सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. मात्र, दरम्यान जम्बो कोविंड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या आपल्या पोटच्या गोळ्यासाठी आता या माऊलीने उपोषणचा मार्ग निवडला आहे.
  5. कृषी विधेयकांना विरोध; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन – केंद्र सरकारची ही धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा दावा शेतकरी संघटना करत आहेत तर संसदेत संमत करण्यात आलेल्या तीन शेतीविधेयकांमुळे हमीभावाबाबत साशंकता निर्माण झाली असून कृषी बाजाराची व्यवस्थाही बंद होण्याचा धोका आहे.

दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर थोडक्यात घडामोडीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर..

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत