बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमला ‘सत्यमेव जयते 2’ च्या सेटवर दुखापत झाली आहे. या चित्रपटाचं सध्या वाराणसीत चित्रीकरण सुरु असून एक अॅक्शन सीन शूट करत असताना त्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे हे चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी ‘सत्यमेव जयते 2’ चं लखनौमध्ये चित्रीकरण सुरु होतं. हे चित्रीकरण पार पडल्यानंतर चित्रपटाची संपूर्ण टीम पुढील चित्रीकरणासाठी वाराणसीत दाखल झाली होती. मात्र, शूटच्या पहिल्याच दिवशीच जॉनला दुखापत झाली. चेतसिंह किल्ल्याजवळ जॉन अॅक्शन सीन शूट करत होता, त्यावेळी त्याला दुखापत झाली. त्यानंतर जॉन अब्राहमने स्थानिक रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याला सोडण्यात आलं आहे.