टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत 317 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसरी कसोटी जिंकत चार सामन्यांची मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली आहे. पण तिसर्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीवर बंदी होऊ शकते. त्यामुळे विराट तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. कर्णधार विराट कोहलीने तिसर्या कसोटीच्या तिसर्या दिवशी पंच नितीन मेननच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
लाल किल्ला हिंसाचार प्रकरण : तलवार घेऊन हिंसाचारात सहभागी असलेल्या मुख्य आरोपीला अटक
प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आणखी एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. त्याच्या घरातून पोलिसांनी दोन तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी अभिनेता दीप सिद्धू याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केलेली आहे. दीप सिद्धूबरोबरच महिंदर सिंग मुख्य आरोपी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. महिंदर सिंग असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारातील […]
राज्यात आज आणि उद्या पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता
राज्याच्या हवामानात बदल दिसून येत आहेत, त्यामुळे आज आणि उद्या दोन दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमानात घट झाली असून थंडी जाणवत आहे. मात्र दोन दिवस पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
पुन्हा लॉकडाऊन?… नियम न पाळल्यास कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, केल्या ‘ह्या’ सूचना
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा असे आदेश दिले आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबतचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या […]
आधार कार्डमध्ये फोटो आणि मोबाइल नंबर कसा अपडेट करावा, जाणून घ्या
आधार कार्ड वापरकर्ते आधार कार्डवरील फोटो अपडेट करण्यासाठी कोणत्याही कायम नोंदणी केंद्रावर जाऊन हे करू शकतात. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या मते, आधारकार्ड धारकास यासाठी आधार कार्डसह उपस्थित रहावे लागेल. आधार कार्डमध्ये फोटो अपडेट करण्यासाठी सोबत फोटो नेणे आवश्यक नाही. कारण तेथील वेब कॅमेर्याचा वापर करून तिथेच फोटो क्लिक करता येतो. आधारमध्ये माहिती अपडेट […]
ब्रेकिंग : खासदार नवनीत राणा यांना अॅसिड फेकण्याची धमकी, धमकीचे पत्र शिवसेनेच्या लेटरहेडवर?
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना त्यांच्यावर अॅसिड फेकण्याची धमकी दिली आहे. हे धमकीचे पत्र शिवसेनेच्या कथित लेटरहेडवर असल्यामुळे या प्रकाराची दखल घत नवनीत राणा यांनी शिवसेनेनं धमकी दिल्याचा आरोप करत दिल्लीतील नॉर्थ अव्हेन्यू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मागील काही दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, वाढीव वीजबिल अशा अनेक मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर […]
संतापजनक : औषध आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
राजस्थानमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. धौलपूरमधील राजाखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात चार तरुणांनी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी रोजी ही अल्पवयीन मुलगी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पोटात दुखू लागल्याने औषध आणण्यासाठी परिसरातील दुकानात गेली होती. तेथे दुकान मालक आणि अन्य तिघे जण […]
बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण सुरु असताना स्फोट, ३० दहशतवादी ठार
काबूल : अफगाणिस्तानमधील एक मशिदीत दहशतवादी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेत होते, मात्र ते या दहशतवाद्यांना चाांगलेच महागात पडले आहे. या प्रशिक्षणादरम्यान झालेल्या स्फोटात ३० दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये सहा प्रशिक्षक बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देत होते. परदेशातून आलेले सहा दहशतवादी हे भूसुरुंग बनवण्याच्या कामातील तज्ज्ञ होते. प्रशिक्षक २६ अन्य दहशतवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देत […]
मध्य प्रदेश बस दुर्घटना : 54 पैकी 42 प्रवाशांचे मृतदेह हाती लागले, धक्कादायक माहिती आली समोर
मध्य प्रदेशच्या सिधी येथे आज (मंगळवार) सकाळी 54 प्रवाशांनी भरलेली बस बाणसागर कालव्यात पडली. आतापर्यंत 42 मृतदेह हाती लागले आहेत. या अपघातातील ६ जण वाचले आहेत. बसचा चालक स्वत: पोहत बाहेर आला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. बसचालक मार्ग बदलून बस अरुंद रस्त्यावरून घेऊन जात होता, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. काही मृतदेह वाहून गेल्याचीही […]
टीम इंडियाचा 317 धावांनी दणदणीत विजय, क्रमवारीत इंग्लंडची चौथ्या स्थानावर घसरण
टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 317 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाने भेदक मारा करत इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर गुंडाळला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईल अलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. अश्विनने 3 तर कुलदीप […]










