काबूल : अफगाणिस्तानमधील एक मशिदीत दहशतवादी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेत होते, मात्र ते या दहशतवाद्यांना चाांगलेच महागात पडले आहे. या प्रशिक्षणादरम्यान झालेल्या स्फोटात ३० दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये सहा प्रशिक्षक बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देत होते. परदेशातून आलेले सहा दहशतवादी हे भूसुरुंग बनवण्याच्या कामातील तज्ज्ञ होते.
प्रशिक्षक २६ अन्य दहशतवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देत होते. बाल्फ प्रांतातील दौलताबाद जिल्ह्यातील कुल्ताक गावामध्ये ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या सहा परदेशी दहशतवाद्यांची ओळख पटवता आली नाही. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे तालिबानी दहशतवादी एक मशिदीत एकत्र आले होते. या मशिदीत त्यांना आयईडी आणि बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.