Fire
महाराष्ट्र मुंबई

ब्रेकिंग : आरे कॉलनी जंगलात भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

मुंबईतील आरे कॉलनीच्या वनक्षेत्रात भीषण आग लागल्यामुळे दहशत पसरली आहे. आजूबाजूच्या लोकांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, जंगलाच्या आगीमुळे झाडांचे फार नुकसान झाले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरे कॉलनीत असलेल्या वनक्षेत्रात आग लागली. रॉयल पाम हॉटेल जवळच ही आग सुरू झाली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आणि आग विझवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, स्थानिक पोलिस परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत