Legislative Council by-election: BJP's Amrish Patel wins from Dhule-Nandurbar
महाराष्ट्र

विधानपरिषद पोटनिवडणुक : धुळे-नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेल विजयी, महाविकास आघाडीला धक्का

धुळे : धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. धुळे-नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा २३४ मतांनी पराभव झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अमरीश पटेल यांना ३३२ मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना केवळ ९८ मतं मिळाली. चार मते बाद झाली. या निवडणुकीत एकूण ४३७ मतदारांपैकी ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज होत आहे. तीन पदवीधर, दोन शिक्षक व एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात ही निवडणूक झाली होती. त्यापैकी धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल लागला आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. त्यानंतर काही वेळातच विजयी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत