IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना चेन्नई येथे खेळला जात आहे. आज रविचंद्रन अश्विनने दमदार शतक पूर्ण केले. तिसर्या दिवशी टीम इंडियाने दुसर्या डावात 9 विकेट गमावून 260+ धावा केल्या. संघाने आतापर्यंत इंग्लंडवर 460+ धावांची आघाडी घेतली आहे.
सध्या रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज क्रीजवर आहेत. अश्विनने 5 वे कसोटी शतक ठोकले. टीम इंडियाचा कर्णधार कोहलीने 149 चेंडूंत 62 धावा फटकावल्या. त्याला मोईन अलीने LBW केले. कोहलीने अश्विनबरोबर 7 व्या विकेटसाठी 177 चेंडूत 96 धावांची भागीदारी केली