Five killed in Mumbai-Pune expressway accident
महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनजीक फुडमॉलजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. कंटेनर ट्रेलर, इनोव्हा कार, क्रेटा कार, टेम्पो, ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एका कंटेनरने मागच्या बाजूने टेम्पोला धडक दिली. या धडकेमुळे टेम्पो पलटी झाला आणि मागून येणाऱ्या दोन कार टेम्पोला धडकल्या. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने या दोन्ही गाड्यांना धडक दिली.

मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. नवी मुंबईतील डॉक्टर वैभव झुंजारे, त्यांची आई, पत्नी आणि 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. डाॅ. वैभव झुंजारे नवी मुंबई महानगरपालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. जखमींपैकी दोघांना पनवेल, दोघांना वाशी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातातील मृतांची नावे :

1. मंजू प्रकाश नाहर, वय 58 वर्ष, गोरेगाव पश्चिम
2. डॉ. वैभव वसंत झुंझारे, वय 41 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई
3. उषा वसंत झुंझारे, वय 63 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई
4. वैशाली वैभव झुंझारे, वय 38 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई
3. श्रीया वैभव झुंझारे, वय 5 वर्ष, नेरुळ, नवी मुंबई

जखमींची नावे :

१) स्वप्नील सोनाजी कांबळे (३०)
२) प्रकाश हेमराज नाहर (६५)
३) अर्णव वैभव झुंझारे (११)
४) किशन चौधरी (गंभीर जखमी)
५) काळूराम जमनाजी जाट (गंभीर जखमी)

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत