मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींना गती देणारा हा मार्ग आता ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे नव्या उंचीवर पोहोचत आहे. केवळ वाहतूक सुलभ करण्यापुरता मर्यादित न राहता, हा प्रकल्प राज्याच्या व्यापक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा हा महामार्ग दररोज हजारो वाहनांची वाहतूक […]
टॅग: Mumbai-Pune expressway
मुंबई-पुणे-द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल
मुंबई : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात गॅस टँकरच्या अपघातामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना झालेल्या त्रासाची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या पुढील काळात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक आराखडा मुंबई पुणे द्रुतगती महामार्गासाठी तयार करण्याचे निर्देश एमएसआरडीसी त्याचप्रमाणे पोलिसांना दिले आहेत. गॅस टँकर उलटल्यामुळे […]
राज्यात रस्ता अपघातांतील मृत्यूदरात घट; परिवहन विभागाच्या उपाययोजनांना यश
मुंबई : महाराष्ट्र राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यातील रस्ता अपघातांमधील मृत्यूदरात घट नोंदविण्यात आली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यात एकूण ३३,००२ अपघात झाले असून, त्यामध्ये १४,०६६ अपघाती मृत्यू झाले आहेत. मागील वर्षी याच कालावधीत ३२,७८४ अपघातांत १४,१८५ […]
गडकरी यांनी केली दुसऱ्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेची घोषणा, पुण्यासाठी ५०,००० कोटींच्या विकास प्रकल्पांचा समावेश
पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रासाठी मोठ्या पायाभूत सुविधा पॅकेजची घोषणा केली असून, त्यामध्ये दुसरा मुंबई–पुणे एक्सप्रेसवे आणि पुणे जिल्ह्यासाठी सुमारे ₹५०,००० कोटींच्या विकास प्रकल्पांचा समावेश आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री गडकरी यांनी सांगितले की, येणाऱ्या वर्षासाठी राज्यभरात एकूण ₹१.५ लाख कोटींचे रस्ते विकास प्रकल्प मंजूर करण्यात आले […]
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर चार वाहनांचा विचित्र अपघात, दोन जण गंभीरपणे जखमी
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पनवेलजवळ मंगळवारी एक मोठा अपघात घडला, ज्यात अनेक वाहनांची विचित्र टक्कर झाली. यात दोन जण जखमी झाले. हा अपघात खांदेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मुंबईकडे जाणाऱ्या लेनमध्ये घडला. मिळालेल्या माहितीनुसार, एक कंटेनर ट्रकमध्ये बिघाड झाल्याने तो रस्त्यावर उभा होता. ट्रकचे इंजिन बंद पडल्यामुळे, दोन मेकॅनिक त्याची दुरुस्ती करण्यासाठी त्या ट्रकच्या जवळ उभे […]
मुंबई-पुणे एक्सप्रेसवे : पनवेल एक्झिट मार्ग ११ फेब्रुवारीपासून सहा महिने राहणार बंद
पनवेल : पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट रोड ११ फेब्रुवारीपासून सहा महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वापरणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासात मोठा बदल करावा लागेल. कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पांतर्गत कळंबोली सर्कल येथे कन्स्ट्रक्शन कामामुळे हे बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) या ठिकाणी नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्याची […]
अपघातचक्र सुरूच! मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा भीषण अपघात; एक जण जागीच ठार
लोणवाला : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट जवळील तीव्र उतारावर भीषण अपघात झाला आहे. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने पुढे जाणाऱ्या एका इर्टिगा कारला धडक दिली आणि त्यानंतर कंटेनर मार्गाच्या कडेला उलटून अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. […]
नितेश राणे यांच्या कारला ट्रकची धडक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात
पुणे : कणकवलीतील भाजप आमदार नितेश राणे यांच्या कारला ट्रकने धडक दिल्याची बातमी समोर आली आहे. कारमध्ये त्यांच्यासोबत कुटुंबीयही होते, असे सांगण्यात येत आहे. याविषयी माहिती देताना स्थानिक पोलिसांनी सांगितले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उर्स टोल प्लाझा येथे झालेल्या या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. नितेश राणे आणि त्यांचे कुटुंबीय प्रसिद्ध लालबागचा राजा येथे प्रार्थना करण्यासाठी […]
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. खालापुर टोलनाक्याला भेट दिल्यानंतर याठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ह्या सूचना दिल्या. सण-उत्सव, सुट्ट्यांच्या काळात या द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि पथकर नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवावे. सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच अपघात […]
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात; ट्रेलरची एकापाठोपाठ ४ कारना धडक.. असा झाला अपघात..
खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडील मार्गिकेवर ट्रेलरने चार कारना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ हा भीषण अपघात झाला. ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रेलरने मुंबईच्या दिशेकडील मार्गिकेवर एका कारला धडक दिली. […]










