लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टेम्पोची ट्रकला मागून जोरात धडक बसून भीषण अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मळवली जवळील देवले गावच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोची ट्रकला धडक बसली. मिळालेल्या माहितीनुसार, कोंबड्यांची वाहतूक करणारा […]
टॅग: Mumbai-Pune expressway accident
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात; ट्रेलरची एकापाठोपाठ ४ कारना धडक.. असा झाला अपघात..
खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडील मार्गिकेवर ट्रेलरने चार कारना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ हा भीषण अपघात झाला. ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रेलरने मुंबईच्या दिशेकडील मार्गिकेवर एका कारला धडक दिली. […]
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, चार जणांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर आज सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये सहा वाहने विचित्रपणे एकमेकांना धडकली. या अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून एकूण आठजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना पनवेलच्या एम जी एम रूग्णालयात […]
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू
लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट ते फुडमॉल दरम्यानच्या तीव्र उतारावर ही दुर्घटना घडली. या अपघातात कारमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला. […]
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनजीक फुडमॉलजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. कंटेनर ट्रेलर, इनोव्हा कार, क्रेटा कार, टेम्पो, ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. एका कंटेनरने मागच्या बाजूने […]





