Shiv Sena clarifies its role in Pooja Chavan suicide case

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेने स्पष्ट केली त्यांची भूमिका

पुणे महाराष्ट्र

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल. जे पुढं येईल त्याप्रमाणे कारवाई होईल. पोलिसांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. निःपक्षपातीपणे याचा तपास होईल, असं नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच या गोष्टीचं राजकारण करू नये, असही त्यांनी म्हटलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या कि, मृत्यू संशयास्पद झालेला आहे, यात कोणतीच शंका नाही. परंतु, पूजा चव्हाणच्या मृतदेहाचा पीएम रिपोर्ट अजून यायचा आहे. व्हायरल झालेल्या क्लिपबाबत व्हॉइस सॅम्पल पहावे लागणार आहेत. त्याचाही तपास होईल. कोणत्या पक्षाचा असा हा विषय नाही. पूर्ण तपास होईपर्यंत निष्कर्ष काढणं योग्य नाही. निःपक्षपातीपणे तपास होईल याची ग्वाही देते. त्यांना मंत्रीपदापासून दूर करायचं का नाही हा निर्णय तिन्ही पक्ष मिळून घेतील. सोबतचं जे सरकारवर आरोप करत आहे, त्यांच्यापैकी एकानेही पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची भेट घेतली नसल्याची टीका त्यांनी केली. उगाच कोणत्याही गोष्टीचं राजकारण करू नये, असेही त्या म्हणाल्या आहेत.

पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियात वेगवेगळ्या बातम्या व्हायरल होत आहे. या प्रकरणाशी संबंधित काही ऑडियो क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. यावर बोलताना गोऱ्हे म्हणाल्या, की लीक होणाऱ्या माहितीच्या आधारे बातमी देताना काळजी घ्या. याआधीच्या प्रकरणात अशाच लीक माहितीवर बातम्या दिल्या गेल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागल्याची उदाहरणे आहे. या प्रकरणात असं होऊ नये त्यामुळे लीक माहिती प्रसिद्ध करण्यापूर्वी त्याची वरिष्ठांकडून खातरजमा करा, असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत