big news for home buyers

खुषखबर : मुद्रांक शुल्कात महिलांना एक टक्का सवलत; उद्यापासून ‘हे’ असतील नवीन मुद्रांक शुल्क

अर्थकारण महाराष्ट्र

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण आणि मोठी घोषणा केली होती. राज्यातील महिलांनी कोणताही फ्लॅट, घर, सदनिका, रो-हाऊस इत्यादी खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत दिली जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेची अंमलबजावणी आता उद्यापासूनच म्हणजे १ एप्रिल 2021 या आर्थिक वर्षांपासून केली जाणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राज्य सरकारच्या अटीनुसार महिलांनी मुद्रांक शुल्कातील सवलतचा लाभ घेतला तर संबंधित महिला खरेदीदाराला आपला फ्लॅट, सदनिका, रो-हाऊस इत्यादी खरेदी केल्यापासून 15 वर्षांच्या कालावधीपर्यंत कोणत्याही पुरुष खरेदीदारास विकता येणार नाही. महिला खरेरदाराने जर या नियमाच्या बाहेर जाऊन अशाप्रकारे विक्री केल्यास कमी भरलेले एक टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागले. याशिवाय दंड देखील भरावा लागेल.

राज्याच्या बांधकाम व्यवसायिकांच्या क्रेडाई संघटनेने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे नव्या आर्थिक वर्षात मुल्यांकन दरात वाढ करु नये, अशी विनंती केली होती. त्यांच्या या विनंतीची दखल थोरात यांनी घेतली आहे. त्यांनी या नव्या आर्थिक वर्षात मुल्यांकन दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कोराना काळात राज्य सरकारने मुद्रांक शुल्काच्या दरात सवलत जाहीर केली होती. या सवलतीची तारीख आज संपली असून उद्यापासून पूर्वीप्रमाणे मुद्रांक शुल्क दर लागू होतील, असं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत