Marathi Actor Vikram Gokhale passes away

विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा, ४८ तासात व्हेंटिलेटरही काढण्याची शक्यता

पुणे मनोरंजन महाराष्ट्र

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गेल्या ४८ तासांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज सकाळी ११ वाजता आलेल्या मेडिकल बुलेटीननुसार विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे अशी माहिती मिळत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

‘विक्रम गोखले हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत आहेत व हातपाय हलवत आहेत. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट निघत असून त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे,’ अशी माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याटगिकर यांनी दिली आहे.

गेल्या ४८ तासांपासून विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत सुधारावी म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. आता ते उपचारांना प्रतिसादही देत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत