PAN card can be made in just 10 minutes

दिलासा : पॅनकार्ड-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ, या तारखे पर्यंत लिंक करता येणार

अर्थकारण देश

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे. केलीय. आयकर विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलवरून ही माहिती देण्यात आलीय. आता, पॅन क्रमांक आधार क्रमांकाला जोडण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आलीय. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

‘इन्कम टॅक्स इंडिया’ या ट्विटर हॅन्डलवरून एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलीय. कोविड १९ संक्रमणादरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडण्यासाठी मुदत वाढविली जात असल्याचं म्हटलं गेलंय. ३१ मार्च २०२१ ऐवजी आता ३० जून २०२१ पर्यंत नागरिकांना कोणत्याही शुल्काशिवाय किंवा दंडाशिवाय आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडता येणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे, कोणत्याही दंडाशिवाय आधार आणि पॅन क्रमांक एकमेकांना लिंक करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं नागरिकांची सरकारी अधिकृत वेबसाईटवर एकच झुंबड उडाली होती. नागरिकांनी आज शेवटच्या दिवशी सायबर कॅफे, महा ई-सेवा केंद्र आणि इंटरनेट सुविधा असलेल्या ठिकाणी पॅनकार्ड आधार जोडणीसाठी गर्दी केलेली दिसली. एकाच वेळी अनेक युझर्सनं लॉग इन केल्यानं आयकर विभागाचा सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे वेबसाईटवर आलेल्या नागरिकांच्या पदरी निराशाच पडली. परंतु, उद्या याच कामासाठी १००० रुपयांचा भुर्दंड भरावा लागणार असं वाटत असताना आयकर विभागाकडून पुन्हा एकदा नागरिकांना दिलासा मिळालाय.

उल्लेखनीय म्हणजे, या अगोदरही केंद्राकडून आधार आणि पॅन क्रमांक लिंक करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ दिली गेलीय. गेल्या मंगळवारी २३ मार्च २०२१ रोजी लोकसभेत वित्त विधेयक २०२१ संमत करण्यात आलं होतं. यामध्ये आयकर कायदा १९६१ मध्या नवं कलम २३४ एच नुसार याविषयीची तरतूद करण्यात आलीय. यानुसार, पॅन क्रमांक आधारला लिंक नसेल तर व्यक्तीला १००० रुपयांपर्यंतच दंड ठोठावला जाऊ शकतो. याशिवाय त्या व्यक्तीला पॅन क्रमांक अवैध घोषित झाल्यामुळे इतर अडचणींचा सामना करावा लागू शकतो..

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत