Chandrakant Patil

माढ्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला त्यांनी… चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांवर पलटवार

महाराष्ट्र

सांगली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना लगावला. ते सांगली येथे बोलत होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

“मला गाव सोडून जावं लागतं असं शरद पवार बोलले. पवारांना माढा मधून लढावं लागलं. मात्र पराभूत होतील म्हणून त्यांना माढा सोडावं लागलं. पक्षापेक्षा त्यांनी स्वत:चा विचार केला. माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

शरद पवार आज मुंबईत असताना त्यांना चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पत्रकारांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी “महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं? ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू?”, अशी टिपण्णीही त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचे प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर पलटवार केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत