patanjali sanstha dairies ceo sunil bansal dies dut to covid 19patanjali sanstha dairies ceo sunil bansal dies dut to covid 19

‘पतंजली’च्या डेअरी व्यवसायाचे सीईओ सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन

देश

नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’च्या डेअरी व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, १९ मे रोजी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बन्सल काही दिवसांपासून सर्दी-तापानं आजारी होते. त्यामुळे कोरोना चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. कोरोना संसर्ग त्यांच्या फुफ्फुसापर्यंत पोहचला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

सुनील बन्सल पतंजली आयुर्वेदच्या डेअरी व्यवसायाचा कार्यभार २०१८ पासून सांभाळत होते. बन्सल यांनीच संस्थेला दूध, दही, ताक आणि पनीरसहीत इतर डेअरी प्रोडक्ट तयार करण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर पतंजलीने हे सर्व पदार्थ बाजारात आणले होते.

बाबा रामदेव यांच्या ऍलोपॅथीबद्दलच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनने केला निषेध

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत