flight emergency landing mumbai nagpur paitient
देश महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी : टेकऑफ करताच गळाले विमानाचे चाक, धावपट्टीवर ‘फोम’ पसरवून केली आश्चर्यजनक लँडिंग

मुंबई : नागपूरहून हैदराबादला जाणाऱ्या वैद्यकीय विमानात (एअर ऍम्ब्युलन्स) झालेल्या बिघाडानंतर प्रचंड गोंधळ झाला, पण नंतर हे विमान सुखरुप मुंबईत दाखल झाले आहे. विमानात गडबड झाल्याचे लक्षात येताच ते मुंबईकडे वळविण्यात आले. यासाठी संपूर्ण इमर्जन्सीची घोषणा करण्यात आली. क्रॅश लँडिंगची भीती निर्माण झाली होती, पण अखेर या विमानाला सुरक्षितपणे उतरवण्यात यश मिळाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या विमानात एक रुग्ण, दोन पॅरामेडिकल कर्मचारी आणि दोन क्रू मेम्बर होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमान नागपूरहून उड्डाण करत होते, तेव्हा त्याचा एक टायर निसटला आणि तो जमिनीवर पडला. अशा परिस्थितीत त्या विमानाचे क्रॅश लँडिंग होण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उड्डाणातील उपस्थित वैमानिकांनी समजूतदारपणा दाखविला आणि बेली लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर लँडिंगसाठी मुंबई विमानतळाला सतर्क करण्यात आले. विमानाच्या बेली लँडिंगसाठी धावपट्टीवर फेस पसरवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्याने विमानाच्या सुरक्षित लँडिंगची पुष्टी केली आहे.

जर वेळेत बेली लँडिंग केली नसती तर मोठा अपघातही होऊ सहकला असता. पण वैमानिकाने समयसूचकता दाखवत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि सर्व प्रवाशांना सुखरुप मुंबईत दाखल करण्यात आले. विमानातील रुग्णास मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फ्लाइटमधील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.

flight emergency landing mumbai nagpur paitient

सुरक्षित लँडिंगसाठी धावपट्टीवर ‘फोम’ पसरवण्यात आला होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विमानही अपघातातून बचावले असून सर्व प्रवासीही सुखरुप आहेत. पण या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेमुळे अनेक प्रश्न उद्भवले आहेत. नक्की कोणत्या स्तरावर दुर्लक्ष झाले, ही बाब तपासण्यासारखी आहे.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत