Encounter specialist Dayanand Nayak transferred to Gondia
महाराष्ट्र मुंबई

एन्काउंटर स्पेशालिस्ट दयानंद नायक यांची थेट गोंदियात बदली, चर्चांना उधाण

मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट व सध्या मुंबई शहर दहशतवाद विरोधी पथकात सेवेत असलेले पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांची थेट गोंदियात बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दया नायक हे सध्या दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथे सेवेत आहेत. त्यांची तिथून गोंदिया जिल्हा जात प्रमाणपत्र समिती येथे बदली करण्यात येत आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, दया नायक यांच्या बदलीमागे प्रशासकीय कारण देण्यात आले असले तरी त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू आहेत. अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण पुढे आल्यानंतर बदल्यांचा धडाकाच लावण्यात आला. त्यातच आता दया नायक यांची बदली करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

दया नायक यांनी गेल्या वर्षभरात अनेक हाय प्रोफाइल प्रकरणं हाताळली आहेत. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांना धमक्या आल्याची चर्चा होती. त्याच्या तपासाचं कामसुद्धा दया नायक यांच्याकडेच होते. राज्यातील या बड्या नेत्यांना धमकी आल्याने त्याचा तपास एटीएसतर्फे दया नायक करत होते. या तपासासाठी त्यांना मुंबई बाहेर आणि राज्याच्या बाहेरही जावं लागलं होतं. मनसुख हिरन हत्येचा तपास करण्यासाठी ज्या टीम नेमल्या होत्या. त्यातील जूहू एटीएसच्या टीमचे इन्चार्ज म्हणून दया नायक काम करत होते.

कोण आहेत दया नायक ?

  1. प्रदीप शर्मा यांच्यासोबत दया नायक यांनी क्राइम ब्रांचमध्ये काम सुरू केलं. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर स्कॉडमध्ये होते.
  2. 1995 मध्ये दया नायक यांची महाराष्ट्र पोलीस फोर्समध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.
  3. 1996 साली दया नायक यांनी पहिला एन्काउंटर केला होता. आतापर्यंत जवळपास 80 एनकाउंटर दया नायक यांच्या नावावर आहेत. 1998-99 पासून नायक एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले.
  4.  दया नायक यांच्यावर अनेक आरोपही झाले आहेत. 2004 मध्ये दया नायक यांची चौकशी करण्यात आली होती.
  5. त्यांना बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत लिंक असल्याच्या आरोपावरून पोलीस सेवेतून 2006 साली निलंबित करण्यात आलं. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ने त्यांना अटक केली होती.मुंबई पोलिसमध्ये सध्या
  6. 2012 साली दया नायक यांना सेवेत परत घेण्यात आलं. त्यानंतर त्यांची पोस्टिंग मुंबईत झाली. 2014 मध्ये नायक यांना नागपूरला पोस्टिंग मिळाली. पण ते नागपूरला गेले नाहीत. त्यामुळे त्यांना 2014 मध्ये पुन्हा निलंबित करण्यात आलं होतं.
  7. त्यानंतर पुन्हा नायक यांना 2016 मध्ये सेवेत घेण्यात आलं. सध्या दया नायक मुंबई एटीएसच्या जुहूचौकी युनिटचे प्रमुख आहेत. PI म्हणून कार्यरत असलेल्या दया नायक यांच्याकडे जुहू एटीएसची जबाबदारी आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत