Tiger Kills 68 Year Old Man In Tadoba

वाघाच्या हल्ल्यात ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू, पाणी पिण्यासाठी नाल्यावर आला होता वाघ

महाराष्ट्र

चंद्रपूर : मरोडा येथील एका वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर झोनमध्ये रविवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास समोर आली. मनोहर अद्कुजी प्रधान (वय ६८) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर प्रधान हे रविवारी सकाळी रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेला त्यांचा मुलगा आणि सुनेला डबा देण्यासाठी गेले होते. त्यानंतर डबा देऊन परत घराकडे येताना ते ताडोब्याच्या बफर झोनमधील मूल वन परीक्षेत्राच्या मरोडा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७७९ मध्ये आंबे तोडण्यासाठी गेले. त्याचवेळी, डोंगराजवळ असणाऱ्या नाल्यावर एक वाघ पाणी पिण्यासाठी आला, यावेळी वाघाने या वृद्धाला बघितले आणि त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मनोहर प्रधान दुपारपर्यंत घरी न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता, त्यांचा मृतदेह नाल्याजवळ आढळला. या घटनेनंतर गावकऱ्यांना जंगलात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात २० मे रोजी वाघाच्या हल्ल्यामध्ये तीन जण ठार झाले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून वन विभागाने या भागातील तेंदूपत्ता संकलन थांबविले आहे.

खळबळजनक! किरकोळ कारणावरून फळविक्रेत्याने केली टॅक्सीचालकाची निर्घृण हत्या

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत