नवी दिल्ली : एका खासगी स्कूल बसमध्ये 6 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ झाल्याची माहिती दिल्ली महिला आयोगाला (DCW) मिळाली आहे. याबाबत DCW ने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “दिल्लीतील एका खाजगी शाळेच्या बसमध्ये एका मुलाने 6 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या आईने सांगितले की तक्रार मागे घेण्यासाठी शाळा त्यांच्यावर दबाव आणत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीस देण्यात आली आहे. शाळेवरही कडक कारवाई व्हायला हवी.” स्वाती मालीवाल यांनी पुढे लिहिले आहे की, ‘८५ वर्षांची वृद्ध असो की ६ वर्षांची मुलगी, कोण सुरक्षित आहे?’
दिल्ली में एक प्राइवेट स्कूल की बस में 6 साल की बच्ची के साथ सीनियर लड़के ने यौन शोषण किया। लड़की की माँ ने हमे बताया कि स्कूल उनके ऊपर शिकायत वापिस लेने का दबाव बना रहा है। मामले में दिल्ली पुलिस को नोटिस करा है। स्कूल पे भी कड़ी कार्यवाही होनी चाहिए!
85 साल की अम्मा हो या 6… pic.twitter.com/L5sEPRfwZ8
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) September 2, 2023
DCW कडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी दिल्लीतील बेगमपूर भागातील एका खाजगी शाळेत शिकते. मुलीच्या आईने सांगितले की, 23 ऑगस्ट रोजी जेव्हा तिच्या मुलीच्या शाळेच्या बसने तिला त्यांच्या सोसायटीच्या गेटवर सोडले तेव्हा तिने पाहिले की तिच्या मुलीची बॅग लघवीने ओली झाली होती.
मुलीकडे विचारपूस केल्यावर मुलीने सांगितले की, वरच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी स्कूल बसमध्ये मुलीची छेड काढत असे. मुलीच्या आईने सांगितले की, ती तिच्या पतीसह 24 ऑगस्ट रोजी शाळेत गेली आणि शाळेच्या मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापकांना घटनेची माहिती दिली. 25 ऑगस्ट रोजी चेअरमनने त्यांना शाळेत बोलावून तक्रार मागे घेण्यास सांगितले, असा त्यांचा आरोप आहे. शाळेच्या अध्यक्षांनी समाजातील लोकांमध्ये मुलीची ओळख उघड केल्याचा आरोपही त्यांनी केला. घटनेशी संबंधित सर्व बाबी लक्षात घेऊन DCW ने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून 5 सप्टेंबरपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले आहे.




