राजस्थान : राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यात एका महिलेला मारहाण करून विवस्त्र केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ती महिला पाच महिन्यांची गर्भवती आहे. ती जीवाच्या आकांताने रडत होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी पहाडी गावातील एका 21 वर्षीय महिलेला तिच्या पती आणि नातेवाईकांनी तिला विवस्त्र करून गावातून तिची धींड काढली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी दखल घेत महिलेच्या पतीसह अन्य तीन जणांना ताब्यात घेतले आहे. इतर सहभागी नातेवाईकांचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणी फरार नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सहा जणांची टीम गठित करण्यात आली आहे. प्रतापगढ पोलिस अधीक्षक अमित कुमार या संदर्भात अधिक तपास करत आहे.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, एका महिलेलेा मारहाण करून विवस्त्र केल्याचा एक व्हिडीओ मीडियावर व्हायरल होत आहे. सुसंस्कृत समाजात अशा घटनांना स्थान नाही. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून हे प्रकरण फास्ट्र ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे.
प्रतापगढ़ जिले में पीहर और ससुराल पक्ष के आपसी पारिवारिक विवाद में ससुराल पक्ष के लोगों द्वारा एक महिला को निर्वस्त्र करने का एक वीडियो सामने आया है।
पुलिस महानिदेशक को एडीजी क्राइम को मौके पर भेजने एवं इस मामले में कड़ी से कड़ी कार्रवाई के निर्देश दिए हैं।
सभ्य समाज में इस…
— Ashok Gehlot (@ashokgehlot51) September 1, 2023




