ब्रिटन सामान्य नागरिकांसाठी कोरोना लसीकरण करणार्या पहिल्या राष्ट्रांपैकी एक होता. तथापि, त्यानंतर तिथे कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन मिळाल्यामुळे चिंतेत भर पडली होती. परंतु आता याबद्दल एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. दावा केला गेला आहे की भारतात बनवलेल्या कोविशील्ड या कोरोना लसीमध्ये नवीन स्ट्रेनविरुद्ध लढण्याची संपूर्ण ताकद आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्रॅजेनेका यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे बनवलेल्या कोविशील्डची लस नव्या स्ट्रेनविरूद्ध अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे. ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेकाच्या मते, कोविशील्ड लस विषाणूचे मूळ स्वरूप असलेल्या सार्स कोव्ही -2 (SARS CoV-2)च्या ब्रिटीश आवृत्ती विरूद्ध देखील समान संरक्षण प्रदान करते.
ऑक्सफोर्ड लसीकरणाच्या चाचणीचे मुख्य वैज्ञानिक प्रोफेसर अँड्र्यू पोलार्ड यांनी एका निवेदनात म्हटले आहे कि, “युनायटेड किंगडममधील ChAdOx1 लसीच्या आमच्या चाचण्यांमधील आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की ही लस कोरोनाच्या मूळ विषाणूपासूनच संरक्षण करते असे नाही तर नवीन स्ट्रेनपासून देखील संरक्षण देते.
संशोधनानंतर वैज्ञानिकांनी काढलेल्या निष्कर्षांचा अजून आढावा घेण्यात आलेला नाही. तथापि, संशोधनाच्या सविस्तर विश्लेषणाने असे सिद्ध झाले आहे की लसीचा एकच डोस संसर्ग आणि संसर्गाचा कालावधी कमी करू शकतो, परिणामी कोरोनाचा प्रसार कमी होतो.




