'Yas' can turn into a cyclonic storm, preparations for rescue on east coast start

आज उद्भवू शकतो ‘यास’ चक्रीवादळाचा धोका, ‘या’ राज्यांत हाय अलर्ट, केंद्राने जारी केल्या गाईडलाईन्स

देश

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात तयार होणारे वादळ आज चक्रीवादळामध्ये रूपांतरित होऊ शकते. जर ते चक्रीवादळात रूपांतरित झाले, तर त्याचे नाव ‘यास’ असेल. ओमानने चक्रीवादळाचे नाव निश्चित केले आहे. पूर्व किनाऱ्यावर सुरक्षा आणि बचावाची तयारी सुरू करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबारमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बंगाल आणि ओडिसाला या वादळाचा सर्वाधिक फटका बसेल. तर अंदमान निकोबार आणि पूर्व किनारपट्टीच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे पुराचा धोका देखील उद्भवू शकतो. ओडिसा सरकारने वादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता आपल्या 30 ते 40 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तटरक्षक दल, आपत्ती निवारण दल (DRT), इन्फ्लाटेबल बोट्स, लाइफबॉयज आणि लाइफजेकेट्स यांच्यासह डॉक्टरांची  पथके आणि ऍम्ब्युलन्स तयार ठेवण्यात आले आहेत. बंदर प्राधिकरणे, ऑईल रिग ऑपरेटर, शिपिंग मत्स्यव्यवसाय अधिकारी आणि मच्छीमार संघटना यांना चक्रीवादळाविषयी माहिती देण्यात आली आहे. पूर्वेकडील किना-यावर मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. तटरक्षक दल डोर्नियर विमान आणि जहाजे समुद्रात काम करणाऱ्या मच्छीमारांना हवामानाची माहिती देत आहेत. याव्यतिरिक्त, त्यांना जवळच्या बंदरात परत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ICG ने जवळील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना बंदरांवर उपस्थित असलेल्या लोकांची माहिती ठेवण्याचे आवाहन केले आहे.

ICG प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरातील हवामानावर निरंतर नजर ठेवली जात आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि अंदमान निकोबार बेटांवर ICG रिमोट ऑपरेटिंग स्टेशन (ROS) च्या मदतीने अलर्ट पाठविले जात आहे.

केंद्राने राज्यांसाठी जारी केल्या गाईडलाईन्स :

  1. आपत्कालीन आदेश प्रणाली, आपत्कालीन ऑपरेशन सेंटर आणि नियंत्रण कक्ष तात्काळ सक्रिय करा. नोडल अधिकारी तैनात करा आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल आरोग्य मंत्रालयाला उपलब्ध करून द्या.
  2. किनारी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हॉस्पिटल आपत्ती व्यवस्थापन योजना सुरू करा. या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी असलेल्या तयारीचा आढावा घ्यावा.
  3. वादळाच्या मार्गावर येत असलेल्या भागातील सामुदायिक वैद्यकीय केंद्रे आणि रुग्णालयांमधील रुग्णांना उंच ठिकाणी असलेल्या मोठ्या रूग्णालयात हलविण्यासाठी आगाऊ योजना तयार करा.
  4. आरोग्य संघटनांनी कोरोना व्यतिरिक्त डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकला, चेचक यासारख्या आजारांसाठी देखील तयार राहावे.
  5. कोविड केंद्रांसह चक्रीवादळग्रस्त भागातील सर्व आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ असले पाहिजे. ही सर्व केंद्रे पूर्णपणे कार्यरत असणे आवश्यक आहे.
  6. रुग्णालयांमध्ये वीज, पाणी व इंधनाचा पुरेसा पुरवठा असल्याचं सुनिश्चित करा.
  7. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. आणीबाणीचा विचार करता आवश्यक औषधांचा साठा आगाऊ गोळा करा. ओआरएस, क्लोरीनच्या गोळ्या, ब्लीचिंग पावडर आणि कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या इतर औषधांची व्यवस्था करून ठेवा. कोविड आणि नॉन-कोविड या दोन्ही प्रकारच्या हॉस्पिटलसाठी ही व्यवस्था आवश्यक आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत