Tollywood Producer BA Raju Passed Away Due To Cardiac Arrest

दुःखद : चित्रपट निर्माते आणि ज्येष्ठ पत्रकार बी.ए. राजू यांचे निधन, महेश बाबूंनी वाहिली श्रद्धांजली

मनोरंजन

हैदराबाद : ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रपट निर्माते बी.ए. राजू यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज (22 मे) रात्री उशिरा हैदराबादच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने तेलगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला असून त्यांच्यामागे दोन मुले आहेत. त्यांची पत्नी बी जया या सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका होत्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बी.ए. राजू हे तेलुगु चित्रपटसृष्टी व्यवसायातील एक अविभाज्य भाग होते. ते लोकप्रिय तेलगू चित्रपटमासिक ‘सुपरहिट’ चे संस्थापक आणि संपादकही होते. त्यांनी चार दशकांच्या कारकिर्दीत शेकडो चित्रपटांसाठी पीआर देखील सांभाळले. ते सुपरस्टार महेश बाबू यांचे वैयक्तिक पीआरओ देखील राहिले आहेत. ते अनेक आघाडीचे स्टार, प्रोडक्शन हाऊसेस आणि अभिनेत्रींचे वैयक्तिक पीआरओ देखील राहिले आहेत. ते प्रभास पट्टन, नागार्जुन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह अनेक मोठा स्टार्सचे पीआरओ राहिले आहेत.

गायक केव्हिनच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा, गॅलरीत मॉडेलबरोबर करत होता रोमान्स तेवढ्यात…

महेश बाबू यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले कि, “बी.ए. राजू यांच्या आकस्मिक निधनाने मी फार दु: खी आहे आणि यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मी लहानपणापासूनच त्यांना ओळखतो. आम्ही बर्‍याच वर्षांपासून एकत्र प्रवास केला आणि मी त्यांच्याबरोबर खूप जवळून काम केले. तो एक मृदू हृदयाचा आणि पूर्ण व्यावसायिक माणूस होता, ज्याला सिनेमाबद्दल अत्यंत उत्कट प्रेम होते. आमच्या कुटुंबासाठी आणि मीडियासाठी हे एक मोठे नुकसान आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. तुमची कमतरता नेहमी जाणवेल.”

अभिनेत्री कंगना रनौतच्या बॉडीगार्डवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत