kangana ranauts bodyguard accused of rape and unnatural sex mumbai police registers fir
मनोरंजन

अभिनेत्री कंगना रनौतच्या बॉडीगार्डवर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा वैयक्तिक अंगरक्षक (bodyguard) कुमार हेगडे याच्यावर बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील एका मेकअप आर्टिस्टने कुमारवर हे आरोप केले आहेत. कुमार हेगडे याच्याविरुध्द मुंबईतील डीएन नगर पोलिस ठाण्यात FIR दाखल करण्यात आली आहे. पीडितेने आरोप केला आहे की कुमारने आधी तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर 50,000 रुपये घेऊन तो शहरातून पळून गेला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एका मनोरंजन पोर्टलच्या वृत्तानुसार, कुमार 8 वर्षापूर्वी पीडित मुलीच्या संपर्कात आला होता. गेल्या वर्षी जून महिन्यात त्याने पीडितेसमोर लग्नासाठी प्रस्ताव ठेवला होता. कुमारवर आरोप आहे की त्याने पीडित मुलीवर त्याच्या घरी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पीडित मुलीने असेही म्हटले आहे की तिने 27 एप्रिलला 50,000 रुपये रोख रक्कम कुमारला दिली होती. त्यानंतर तो कर्नाटकला गेला. त्यानंतर त्याच्या आईशी बोलताना पीडित मुलीला समजले की कुमार दुसर्‍या मुलीशी लग्न करणार आहे. त्याच्या आईने पीडित मुलीला आपल्या मुलापासून दूर राहण्यास सांगितले आणि त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणू नको, अशी ताकीद दिली.

पॉप सिंगर लेडी गागाने केले धक्कादायक खुलासे, त्या व्यक्तीने धमकी देऊन केला बलात्कार आणि मग…

कुमार हेगडे हा कंगनाचा बॉडीगार्ड असून कित्येकदा कंगनासोबत दिसला आहे. त्याच्यावर कलम 376 गैरवर्तन, कलम 377 अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि आयपीसीच्या कलम 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंगना अनेकदा कुमार तिच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे असल्याचे सांगताना दिसली आहे. काही दिवसांपूर्वी कंगना रनौतने कुमारचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.

कंगना रनौतचा हेअरस्टाइलिस्ट अ‍ॅलिस्टेयर डी गिया याच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप आहे. त्याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याच्याविरूद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.

गायक केव्हिनच्या मृत्यूप्रकरणात धक्कादायक खुलासा, गॅलरीत मॉडेलबरोबर करत होता रोमान्स तेवढ्यात…

‘जीव झाला येडापिसा’ फेम अभिनेते हेमंत जोशी यांचे कोरोनामुळे निधन

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत