मुंबई : फोर्ड कंपनीच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीमधील आतापर्यंतची सर्वात बेस्ट गाडी आहे. अमेरिकेच्या बाजारात या वाहनाने आता वेगळी ओळख निर्माण केली आहे. अवघ्या 24 तासात Ford F 150 लाईटनिंग गाडीला तब्बल 20 हजार बुकिंग्स मिळाल्या आहेत. हि गाडी सिंगल चार्जमध्ये सुमारे 483 किमीपर्यंत प्रवास करू शकते.
फोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम यांनी एका मुलाखतीत बुकिंगच्या आकडेवारीची पुष्टी केली. Ford F 150 लाइटनिंगची किंमत 39,974 डॉलर्स म्हणजे रु.29,14,७७८ इतकी आहे. त्याच वेळी, XLT आणि रेंज टॉपिंग प्लॅटिनम व्हेरिएंट्सच्या किंमती $ 52,974 आणि $ 90,474 पासून सुरू होतात. बॅटरीवर चालणाऱ्या या पिक अप ट्रकने आतापर्यंत जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे
हा ट्रक दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. या ट्रकचं स्टँडर्ड व्हर्जन सिंगल चार्जमध्ये सुमारे 370 किमीपर्यंत प्रवास करू शकतं. तर त्याचं एक्सटेंडेड व्हर्जन सिंगल चार्जमध्ये सुमारे 483 किमीपर्यंत प्रवास करू शकतं. या गाडीची बॅटरी 10 मिनिटांत इतकी चार्ज होते की, हा इलेक्ट्रिक पिक-अप ट्रक 87 किलोमीटरपर्यंतचं अंतर कापू शकतो. यासह, ही बॅटरी केवळ 41 मिनिटांत 15 ते 80 टक्के इतकी चार्ज होते.
America’s truck, electrified.
This is the #F150Lightning.
— Ford Trucks (@FordTrucks) May 20, 2021
फोर्डच्या या पिकअपमध्ये स्टँडर्ड बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे हा पिकअप सिंगल चार्जमध्ये 370 किमी धावतो. ही गाडी 563 bhp पॉवर आणि 1000Nm टॉर्क जनरेट करते. यात 15 इंचाची इन्फोटेन्मेंट स्क्रीन आहे, तर 12 इंचाचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. हा पिकअप ट्रक 4.5 सेकंदात 100 किमी प्रतितास वेग धारण करु शकतो. या ट्रकचं वजन 2,267 किलो इतकं आहे.




