Haryana police officer tries to stop illegal mining, run over by truck

संतापजनक! खाण माफियांनी DSP सुरेंदर सिंग यांच्या अंगावर घातला डंपर, जागीच मृत्यू

क्राईम देश

हरियाणा : पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) सुरेंदर सिंग यांनी कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी डंपर-ट्रकला थांबवण्याचा इशारा दिला. मात्र, डंपरचालकाने वेग वाढवत डंपर त्यांच्या अंगावर घातला. या घटनेत डीएसपी सुरेंदर सिंग यांचा मृत्यू झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंह हे त्यांच्या पथकासह तौरूजवळील पाचगाव परिसरातील अरवली डोंगरावरील अवैध खाणकामावर छापा टाकण्यासाठी गेले होते. आज सकाळी 11.50 च्या सुमारास डीएसपी आणि त्यांच्या टीमला एक संशयास्पद डंपर दिसला आणि त्यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. त्यांनी ड्रायव्हरकडे कागदपत्रे मागितली. यावेळी डंपरचालकाने वेग वाढवून त्यांना पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी बाकी सर्वांनी जीव वाचवण्यासाठी बाजूला उड्या मारल्या, मात्र सुरेंदर सिंग यांना बाजूला जाण्याची संधी मिळाली नाही आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. एफआयआर नोंदवण्यात आला असून डंपर चालकाला पकडण्यासाठी पथके छापे टाकत आहेत. खाण माफियांकडून पोलिसांवर हल्ले करण्यासाठी नूह जिल्हा कुप्रसिद्ध आहे. 2015 पासून दरवर्षी अशा सरासरी 50 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंदर सिंग हे 1994 मध्ये हरियाणा पोलिसात सहाय्यक-उपनिरीक्षक म्हणून भरती झाले होते. सध्या ते डीएसपी, तौरू या पदावर होते आणि चार महिन्यांत ते निवृत्त होणार होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत