crime

पुणे हादरलं! वास्तुशास्त्र सल्लागाराला कॉफीतून गुंगीचे ओैषध, अपहरण नंतर खून,  १७व्या दिवशी गूढ उलगडलं

क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे : बिबवेवाडीतील वास्तुशास्त्र सल्लागाराचे अपहरण करून त्याचा खून झाल्या नंतर निरा नदीत शोध मोहीम राबवित अली होती. १७ दिवसांनी वास्तुशास्त्र सल्लागाराचा मृतदेह शोधून काढला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीसांनी दोघांना अटक केली होती. खूनानंतर आरोपींनी मृतदेह निरा नदीत फेकून दिला होता. निलेश वरघडे (वय ४३, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या वास्तूशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी वरघडे यांचा मित्र दीपक जयकुमार नरळे (रा. नर्‍हे, आंबेगाव), साथीदार रणजीत ज्ञानदेव जगदाळे (वय २९) यांना अटक केली आहे. याबाबत रुपाली रुपेश वरघडे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. निलेश वरघडे वास्तूशास्त्र सल्लागार होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरोपी निलेश यांच्या परिचयाचे होते. दोघांनी निलेश यांना कॉफीतून गुंगीचे ओैषध दिले. बेशुद्ध पडल्यानंतर निलेश यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी निलेश यांचा मृतदेह पोत्यात भरून नीरा नदीत टाकून देऊन आरोपी पसार झाले होते. तांत्रिक तपासावरून पोलिसांनी आरोपींना अटक केली. मात्र, मृतदेह आढळून आला नाही. आरोपींना अटक केल्यापासून पोलिसांकडून निरा नदीत मृतदेहाचा शोध घेतला जात होता.

पोलिसांनी महाबळेश्वर ट्रेकर्स, भोईराज आपत्ती संघ, महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संघाच्या मदतीने अखेर सतराव्या दिवशी वरघडे यांचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक संजय आदलिंग, विवेक सिसाळ, हवालदार शाम लोहोमकर, सतीश मोरे, तानाजी सागर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत