A big relief to Devendra Fadnavis, the court acquitted him in the case of hiding information

देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा, माहिती लपवल्याच्या प्रकरणात न्यायालयाने केलं दोषमुक्त

महाराष्ट्र राजकारण

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याप्रकरणी कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकरणांची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप होता ती खासगी होती आणि त्याचा निवडणुकीवर परिणाम झाला असता असे वाटत नाही, हे स्पष्ट करत न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

याचिकाकर्ते सतिष उके हे कारागृहातून ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीला हजर होते. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप अ‍ॅड. सतीश उके यांनी केला होता. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संग्राम जाधव यांनी सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांची माहिती लपवली असा आरोप अ‍ॅड. सतीश उके यांनी याचिकेतून केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या वकिलांनी नजरचुकीने हे गुन्हे शपथपत्रात नमूद करण्याचे राहून गेले होते असा दावा केला होता. मात्र, आज त्याप्रकरणी निर्णय देत न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत