मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट्ट आणि रणबीर कपूर ही जोडी सध्या त्यांच्या होणाऱ्या बाळामुळे चर्चेत आहे. लवकरच त्यांच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. नुकतंच आलिया भट्टला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आलियाला सकाळी ७.30 च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आहे. सर्व चाहते या बातमीकडे लक्ष लावून आहेत.
बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आई-वडील होणार आहेत आणि ही गोष्ट कोणापासून लपून राहिलेली नाहीय. या लोकप्रिय जोडप्याने लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यांनंतरच आपल्या घरी छोटा पाहुणा येणार असल्याची घोषणा केली होती. जूनमध्ये आलियाने सोनोग्राफी रुममधून एक फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. आलिया आणि रणबीर आपल्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी प्रचंड उत्सुक आहेत. आज सकाळी रणबीर-आलिया मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलबाहेर दिसले आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपं त्यांच्या पहिल्या मुलाच्या प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचलं आहे.
आलियाची डिलीव्हरी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. गिरगावातील ‘एच.एन. रिलायंस फाऊंडेशन’ या रुग्णालयात आलिया बाळाला जन्म देणार आहे. आलियाचे सासरे म्हणजेच ऋषी कपूर यांनादेखील प्रकृती बिघडल्यानंतर याच रुग्णालयात दाखल करण्यात होते. याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिनेत्री आलिया भट्ट्ट बाळाच्या जन्मानंतर मॅटरनिटी लीव्हवर जाणार आहे. आलिया एका वर्षाचा ब्रेक घेणार आहे. आलिया भट्ट्टने मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी आलियाने हा निर्णय घेतला आहे. ब्रेकवर जाण्यासाठी आलियाने आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.




