Nilesh Rane's harsh criticism on Sanjay Raut's statement

उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान झाले तर… निलेश राणे यांची संजय राऊत यांच्या वक्तव्यावर घणाघाती टीका

महाराष्ट्र राजकारण

निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच कोणत्याही गोष्टीवर टीका करण्यात भाजपचे काही लोक आघाडीवर असून त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला होता. भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्याच्या भूकंपाचे केंद्रबिंदू शिवसेना भवन असेल, असा गौप्यस्फोटही संजय राऊतांनी यावेळी केला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

त्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं कि, “उद्धव ठाकरे आपल्या देशाचा पंतप्रधान होण्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही. एक शहर सांभाळू शकत नाही, कुबड्यांवर सरकार चालवतोय, आजाराला घाबरून घरातून बाहेर निघत नाही, हा माणूस जर PM झाला तर पाकिस्तानात फटाके फुटतील. फेस मास्क देशाचा नवीन झेंडा करेल आणि देशाचं वाटोळं लावेल हा माणूस.”

निलेश राणे असंही म्हणाले कि, ठाकरे सरकारने महाराष्ट्रात प्रत्येक विभागाचं नुकसान केलं आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, नगर विकास, गृहनिर्माण, कायदा-सुव्यवस्था, महिलांवरचे अत्याचार ह्या सगळ्या विषयात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत