सिंधुदुर्ग : शासनाने नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. गावपातळीवर योजनांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचावा, यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करून गतीमान अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले. राज्यमंत्री योगेश कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीत संबंधित विभागांच्या […]
टॅग: Nilesh Rane
भूमिका बदलली नाही आणि शब्द पाळला तर ते शरद पवार कसले?: निलेश राणे
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्धार केलेले संभाजीराजे छत्रपती यांचा पाठिंबा ऐनवेळी मागे घेतल्याच्या मुद्द्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हे होणारच होते. पवार साहेब आणि शब्द पाळला, असे होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या […]
घरडा केमिकल कंपनीच्या व्यवस्थापकांना अटक व्हायला हवी – निलेश राणे
रत्नागिरीतील लोटे MIDC तील घरडा केमिकल कंपनीत आज सकाळी स्फोट झाला होता आणि त्यानंतर तेथे आग लागली होती. यामध्ये ३ कामगार मृत्युमुखी पडले. या संदर्भात माजी खासदार निलेश राणे यांनी घरडा केमिकल कंपनीच्या व्यवस्थापकांच्या अटकेची मागणी केली आहे. व्यवस्थापकांनी कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केला आहे. या केमिकल कंपनीत कामगारांकडे केमिकल प्रोटेक्शन […]
हा ठाकरे सरकारने मराठा समाजाचा केलेला अपमान, निलेश राणे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा
महाविकासआघाडी सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्याचा निर्णय बुधवारी (23 डिसेंबर) घेतला. त्याबाबत आता निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत याबाबतीत वक्तव्य केलं आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं कि, मराठा समाजाने EWS चे प्रमाणपत्र स्वीकारा सांगून ठाकरे सरकारने मराठा समाजाचा अपमान केला […]
उद्धव ठाकरे आपल्या देशाचे पंतप्रधान झाले तर… निलेश राणे यांची संजय राऊत यांच्या वक्तव्यावर घणाघाती टीका
निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच कोणत्याही गोष्टीवर टीका करण्यात भाजपचे काही लोक आघाडीवर असून त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला होता. भविष्यात ज्या घडामोडी घडतील त्याच्या भूकंपाचे केंद्रबिंदू […]
काही लोकांचं म्हणणं आहे ‘ती’ आत्महत्या नाही, सत्य बाहेर येईलच – निलेश राणे
इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीविरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी अन्वय नाईक व त्यांच्या आईनं आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली, हे पटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या […]






