Nilesh Rane said the managers of Gharda Chemical Company should be arrested
महाराष्ट्र

घरडा केमिकल कंपनीच्या व्यवस्थापकांना अटक व्हायला हवी – निलेश राणे

रत्नागिरीतील लोटे MIDC तील घरडा केमिकल कंपनीत आज सकाळी स्फोट झाला होता आणि त्यानंतर तेथे आग लागली होती. यामध्ये ३ कामगार मृत्युमुखी पडले. या संदर्भात माजी खासदार निलेश राणे यांनी घरडा केमिकल कंपनीच्या व्यवस्थापकांच्या अटकेची मागणी केली आहे. व्यवस्थापकांनी कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नीलेश राणे यांनी केला आहे. या केमिकल कंपनीत कामगारांकडे केमिकल प्रोटेक्शन किट नसल्यामुळे कामगार मृत्युमुखी पडल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ब्रेकिंग : रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीतील घारडा केमिकल कंपनीत स्फोट, तीन कामगार ठार

निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं कि, “लोटे MIDC तील घरडा केमिकल कंपनीत कामगारांकडे केमिकल प्रोटेक्शन किट नसल्यामुळे केमिकल अंगावर पडून कामगार मृत्युमुखी पडले आणि काहीजण गंभीर भाजले. कामगारांवर व्यवस्थापकांच दुर्लक्ष असल्याने घरडा कंपनीच्या व्यवस्थापकांवर IPC 304A अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत