इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली. अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीविरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातच आता भाजप नेते निलेश राणे यांनी अन्वय नाईक व त्यांच्या आईनं आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली, हे पटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी अर्णब यांच्या अटकेसंदर्भात संशय व्यक्त केला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं कि, ‘अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली हे पटत नव्हतं. म्हणून अलिबागमध्ये माहिती काढल्यानंतर असं कळलं की त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्यांनी आत्महत्या केली त्याचे कारण पैसे होऊ शकत नाही, काही लोकांचं म्हणणं आहे ती आत्महत्या नाही. सत्य बाहेर येईलच.’
स्व. अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली हे पटत न्हवतं म्हणून अलिबाग मध्ये माहिती काढल्यानंतर असं कळलं की त्यांची परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्यांनी आत्महत्या केली ते करणं पैसे होऊ शकत नाही, काही लोकांचं म्हणणं आहे ती आत्महत्या नाही. सत्य बाहेर पडेलंच.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 5, 2020