Farmers protest: Another farmer commits suicide by writing a suicide note
नांदेड महाराष्ट्र

ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे मजुराच्या मुलीची आत्महत्या

नांदेड : ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे एका मजुराच्या 17 वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी घरच्यांकडे मोबाइल मागितला, पण वेळेत मोबाइल न मिळाल्याने अकरावीत शिकणाऱ्या बिद्धशीला पोटफोडे या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरातील फुलेनगर वसाहतीत ही घटना घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बुद्धशिलाने ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्यामुळे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मोबाईल मिळाला नाही तर शिक्षण थांबेल, या चिंतेने ग्रासल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. तिला आपण अभ्यासात मागे पडू असे वाटत होते, त्यामुळे तिने आपल्या आई-वडिलांकडे मोबाईल मागितला होता. तिच्या आई-वडिलांनी तिला लवकरत मोबाईल घेऊन देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण तोपर्यंत तिने आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत