महाविकासआघाडी सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्याचा निर्णय बुधवारी (23 डिसेंबर) घेतला. त्याबाबत आता निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत याबाबतीत वक्तव्य केलं आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं कि, मराठा समाजाने EWS चे प्रमाणपत्र स्वीकारा सांगून ठाकरे सरकारने मराठा समाजाचा अपमान केला आहे. १० टक्क्यात मराठा समाजाला काय मिळणार?
मराठा समाजाने EWS चे प्रमाणपत्र स्वीकारा सांगून ठाकरे सरकारने मराठा समाजाचा अपमान केला आहे. मराठा समाजात काही जण आहेत जे NCP च्या पगारावर आहेत त्यांनी ह्या निर्णयाचे स्वागत केले आहे. १० टक्क्यात काय मिळणार मराठा समाजाला??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 26, 2020
दरम्यान, सरकारच्या या भूमिकेमुळे राज्यातील मराठा संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती स्थगिती दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे (EWS) आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकारच्या या निर्णयाला मराठा संघटनामधून विरोध होत आहे.