ranbir kapoor and alia bhatt

कपूर कुटुंबात आली नन्ही परी, आलियाने दिला मुलीला जन्म

मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी इवल्याश्या परीने जन्म घेतलाय. आलिया भट्टने तिच्या संपूर्ण गरोदरपणात काम केले आहे. यादरम्यान आलिया अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावत तिने चक्क चित्रपटाचे प्रमोशन देखील केले. गरोदरपणात आलिया सतत काम करताना दिसली. ब्रह्मास्त्रच्या प्रमोशनसाठी आलिया सतत फिरत होती. आलिया भट्टने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत आपल्या प्रेग्नेंसीची न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे चाहते आता त्यांच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी प्रचंड आतुर आहेत. आलिया आई झाल्याची बातमी कळाल्यापासून चाहते सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरला शुभेच्छा देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आलिया भट्ट आणि बाळाची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. आता चाहते आलियाच्या मुलीचा फोटो पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

आलियाची प्रेग्नेंसी न्यूज कळाल्यापासून चाहत्यांमध्ये उत्साह होता. आलियाच्या प्रेग्नेंसीदरम्यानच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांनी प्रचंड प्रेम दिले. आलियाचे गोदभराईचे काही फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. ज्यामध्ये आलियाचा लूक एकदम जबरदस्त दिसत होता. आलिया सतत आपल्या प्रेग्नेंसीची अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत होती.

रविवारी सकाळी 7 वाजता रणबीर कपूर आलियाला घेऊन हाॅस्पिटलमध्ये पोहचला होता. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. यामुळे एक अंदाज लावला जात होता की, आजच आलिया बाळाला जन्म देणार. आलिया आणि रणबीरनंतर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आलियाची सासू अर्थात नीतू कपूरही पोहचल्या होत्या.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत