mns chief raj thakre
महाराष्ट्र

व्यवसाय बाजूला ठेवा आणि वीज बिलाबाबत मार्ग काढा- राज ठाकरेंनी दिल्या ‘अदानी ग्रुप’ला सूचना

वाढीव वीज बिलाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छेडलेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर ‘अदानी ग्रुप’च्या सीईओनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ‘कृष्णकुंज’ येथे जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर वीज वितरण कंपन्यांनी राज्यातील ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलं पाठवली. जनतेचा आक्रोश वाढत जाईल. जनतेला वीज बिलात सूट द्या, जनक्षोभ झाल्यास मनसे सामान्य नागरिकांच्या बाजूने असेल, असा इशारा राज ठाकरे यांनी ‘अदानी ग्रुप’ला दिला, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.

‘अदानी ग्रुप’ हे व्यवसाय करत आहेत, हे मान्य आहे, मात्र अशा अपवादात्म्क परिस्थितीत व्यवसाय बाजूला ठेवा आणि मार्ग काढा” अशा सूचना त्यांना दिल्याचे सरदेसाई यांनी सांगितले. “ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळोवेळी या मुद्द्याकडे लक्ष वेधले, परंतु अजूनही याबाबत काहीच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, राज ठाकरे यांनी वीज वितरण कंपन्यांच्या वाढीव बिलावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मागणी केली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत